Skip to content
ट्रस्ट नोंदणी क्र.: महा./ ३६५२०/ को./ फ-३६९५९/ कोल्हापूर
+९१ - ९४२१ १०४८ ३५

शिरोळ ग्रामी मृतपुत्रासी जीवन दिधले तुम्हीच ना । मातेकडूनी औदुबराची सेवा घेतली तुम्हीच ना।।
पिशाच्च पीडा सहज दवडिली शिरोळ ग्रामी तुम्हीच ना । विप्रस्रीयेच्या भक्तिसाठी सुपुत्र दिधले तुम्हीच ना ।।

ता. शिरोळ जि. कोल्हापूर

Menu
अध्यक्षमो. ९४२११०४८३५
श्री. संजय. द. माने पाटील
अध्यक्ष
मो. ९४२११०४८३५
उपाध्यक्षमो. ८७९११११७७७
श्री. संजय. आ. चावरे
उपाध्यक्ष
मो. ८७९११११७७७
सचिवमो. ९८२३७७९०६०
श्री. धोंडीराम. जो. दबडे
सचिव
मो. ९८२३७७९०६०

श्री दत्तगुरू भोजनपात्र मंदीर, शिरोळ

।। शिरोळग्रामी माध्यान्ह समयी जीवन दिधले तुम्हीच ना “मातेकडूनी औदुंबराची सेवा घेतली तुम्हीच ना ॥
“पिशाच्च पीडा सहज दवडिली शिरोळ ग्रामी तुम्हीच ना ॥ विप्रस्त्रियेच्या भक्तीसाठी सुपुत्र दिधले तुम्हीच ना ॥

कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेस ४५ कि.मी. अंतरावर श्री दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरोळ हे तालुक्याचे ठिकाण आहे. शिरोळपासून दक्षिणेस ३ कि.मी. अंतरावर कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावरती नृसिंहवाडी आहे. नृसिंहवाडी हा शिरोळचाच भाग असून गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून नृसिंहवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे. पूर्वी एकच ग्रामपंचायत होती. शिरोळ गावाला तसा ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेला आहे. शिरोळमध्ये प्राचीन काळापासून महादेव (कल्लेश्वर) मंदीर, बुवाफन महाराज मंदीर, श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदीर, हनुमान मंदीर, छत्रपती ताराराणींची गादी आहे, अशा या पवित्र ठिकाणी दत्तगुरूंचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे नृसिंहवाडी येथे इ. सन १३६४ ते १३७६ मध्ये १२ वर्षे तपस्येकरीता वास्तव्य होते. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज पंचक्रोशित भिक्षेकरीता जात असत. असेच एकेदिवशी महाराज शिरोळग्रामी भिक्षेकरीता अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या श्री गंगाधरपंत कुलकर्णी या ब्राह्मणाच्या घरी आले. उजव्या हातात ब्रह्म, धेनू, नाग, शंख आणि परशुमुद्रा या पांच मुद्रा बांधलेला दंड व डाव्या हातात भिक्षापात्र घेवून संन्याशाच्या नियमानुसार भिक्षेकरीता ॐ हीं असा उच्चार केला. तो शब्द ऐकून घरातून गंगाधरपंताची गृहिणी बाहेर आली व म्हणाली आपण यावे यावे आपलं स्वागत असो. ह्या दर्भासनावर बसावे पाय धुण्यासाठी पाणी घ्यावे. 

0e6b3c9b-2140-4ba8-ab62-adaf23d63dcb-2-330x495

श्री दत्तगुरू भोजनपात्र मंदीर, शिरोळकडे येण्या- जाण्याचा मार्ग 

शिरोळ हे गाव तालुक्याचे ठिकाण असून महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या पुर्वेस ४५ कि. मी अंतरावर येते. शिरोळपासून दक्षिणेला ३ कि. मी अंतरावर नृसिहवाडी आहे. शिरोळला येण्यासाठी कोल्हापूरहून सांगलीहून एस. टी. बस ने येता येते. तसेच जयसिंगपूर येथे रेल्वेची सोय आहे. जयसिंगपूर पासून दक्षिणेस अवघ्या सात किलोमीटर वर शिरोळ आहे. श्री दत्तअवतारी ब्रम्हांडनायक श्री. नृसिह सरस्वती महाराज यांचे तेथे भिक्षास्थान असल्याने त्याला दत्त संप्रदायामधे महत्वाचे स्थान मानले जाते. त्यामुळे त्याची महती महाराष्ट्रभर पसरली आहे.

नावतपशील
बँकेचे नावसेंट्रल बँक ऑफ इंडिया
शाखाशिरोळ
आय एफ. एसी कोडCBIN0283994
बँक अकाउंट नंबर3644762921
cfe3a527-5ed6-4fe7-86d5-7fd792d39fc3-400x564