Skip to content
ट्रस्ट नोंदणी क्र.: महा./ ३६५२०/ को./ फ-३६९५९/ कोल्हापूर
+९१ - ९४२१ १०४८ ३५

शिरोळ ग्रामी मृतपुत्रासी जीवन दिधले तुम्हीच ना । मातेकडूनी औदुबराची सेवा घेतली तुम्हीच ना।।
पिशाच्च पीडा सहज दवडिली शिरोळ ग्रामी तुम्हीच ना । विप्रस्रीयेच्या भक्तिसाठी सुपुत्र दिधले तुम्हीच ना ।।

ता. शिरोळ जि. कोल्हापूर

Menu

महाप्रसाद

अन्नछत्रातील महाप्रसाद व्यवस्था

अन्न हे परब्रम्ह । अन्नदान सर्व श्रेष्ठ दान ।

असे म्हटले आहे. त्यामुळे अन्नदानाची व्याप्तीही खुप मोठी आहे. अन्नाची गरज ही या भुतलावरील मानवासह सर्व प्राणीमात्रांना आहे. अन्नग्रहणाने क्षुधा शमते. अन्नामध्ये साक्षात ईश्वराचा वास असतो, त्यामुळे ह्या महाप्रसादरूपी अन्न सेवनाने मनुष्य तृप्त होतो. एकप्रकारचे मानसिक समाधान मिळते. हे अचुक हेरुन वर सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर सहकाऱ्यांच्या मदतीने श्री दत्तगुरु अन्नछत्र मंडळाची स्थापना करुन दत्त महाराजांच्या दर्शनास्तव येणाऱ्या परगावच्या दत्त भक्तांना महाप्रसाद व्यवस्था केली. सध्या या अन्नछत्रात दर पौर्णिमेला १००० दत्तभक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात. महाप्रसाद गृहात एका वेळेस एक हजार दत्त भक्त महाप्रसाद घेतील अशी व्यवस्था केली आहे. इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक दिवशी महाप्रसाद सुरु करणेचा मानस आहे. तसेच परगावाहून येणाऱ्या भक्तांची राहण्याची सोय करणेकरीता भक्तनिवास बांधणेचा संकल्प आहे.

महाप्रसादासाठी लागणारे धान्य

महाप्रसादासाठी लागणारे धान्य गहू, तांदूळ, मटकी, मुग, तुरडाळ, साखर, रवा, गुळ, चने, वटाणे इ. धान्य व तुप, भुईमुग तेल, मसाल्याचे पदार्थ इ. च्या खरेदीवर व नियंत्रणासाठी विश्वस्थ, क्रियाशील सदस्य व सेवेकरी वर्ग नेमला असून धान्यखरेदी अतिशय काळजीपूर्वक व चौकशी करून केली जाते. तसेच सदरचे धान्य, मसाले, तेल, दर्जेदार असावे, याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाते. त्याचप्रमाणे अन्नदानाच्या उद्देशाने बरेच दत्त भक्त विशेषत्वाने धान्यस्वरूपात व रोख रकमेच्या स्वरूपात देणगी देतात. त्याचा स्विकार करून त्यांना रितसर धान्य/ रक्कम जमा पावती दिली जाते. व हे धान्य अन्नदानासाठी वापरले जाते. श्री दत्तगुरु अन्नछत्राय नियोजित बांधकाम संकल्प पूर्ती करिता यताशक्ती अर्थसहाय्य्य करावे ही नम्र विनंती, सदरची देणगी भविष्यामध्ये आयकर मुक्त करणेस संचालक मंडळ प्रयत्नशिल आहे.